Branch Offices

 • Phondaghat
 • Kankavli
 • Kudal
 • Devgad
 • Vaibhavwadi
 • Malvan
 • Mangaon
 • Sawantwadi

होम

Posted by admin on जुलै 09, 2016
http://vaishyasamajpatsanstha.in/wp-content/uploads/2016/08/education-loan.jpg
http://vaishyasamajpatsanstha.in/wp-content/uploads/2016/08/home-loan.jpg
http://vaishyasamajpatsanstha.in/wp-content/uploads/2016/08/Car-loan.jpg

वैश्य समाज पतसंस्थेमध्ये आपले स्वागत आहे

दिनांक १९/१०/१९९१, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाज जाती बांधवांच्या दृष्टीने खरोखरच भाग्याचा दिवस होता. कारण याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या. फोंडाघाट या संस्थेस नोन्दणी दाखला मिळाला आणि खरया अर्थाने वैश्य समाजाला आर्थिक पाठ्बळाची हमी निर्माण होणाऱ्या आर्थिक विवन्चणेतून एक प्रकारे खात्रीशीर सुट्काच झाली.

फोंडाघाट हे गाव म्हणजे ग्रामिण भागात मोडणारे एक गांव. जरी लहान गांव असले तरी या गावात व्यापाराची परंपरा ही अनेक शतके जुनी असून सिंधुदुर्गातील बराचश्या भागातील व्यापार हा फोंडाघाटधील व्यापारावर अवलंबुन आहे. याचे कारण म्हणजे घाटमाथा आणि कोंकण यांना जोडणारी शेतमालाची मोठी उतार पेठ म्हणून ही बाजारपेठ ओळखली जायची. या गावामधील लोकांचा आर्थिक विकास जोमाने व्हावा या करीता फोंडाघाट मधील काही वैश्य समाजातील मंडळीनी पुढाकार घेवून आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो या निव्वळ जाणीवेतून समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने विचार करण्यास सुरुवात केली. गावासाठी काहीतरी करावे असा निश्चय करुन अशा चांगल्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे ठरविले. यामध्ये प्रामुख्याने कै. दिगंबर गोविंद उर्फ दादा कोरगांवकर, कै. शंकर श्रीधर उर्फ दादा कुशे, कै. गणपत मोदी, श्री. अनंत दत्तात्रय उर्फ अण्णा कोरगांवकर, कै. राधाकृष्ण सोनू पावसकर, श्री. गणपत बिडये, कै. अशोक शामसुंदर पेडणेकर, श्री. राधाकृष्ण भिकू तायशेटे, कै. श्री. राजाराम शंकर मसुरकर, आणि त्यांचे बरेच सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. श्री. देव राधाकृष्णाचा आशीर्वद घेऊन त्याच्याच मंदीरात वैश्य समाजाची एक पतसंस्था सुरू करण्याचे स्वप्न या मंडळीनी पाहीले.

पतसंस्थेची वैशिष्ट्ये

 • सतत ऑडिट वर्ग ‘अ’
 • कार्यक्षेत्र सिंधुदुर्ग जिल्हा
 • संस्थेचे पूर्णतः संगणकीकरण
 • अनुभवण्यासारखी आपुलकीची तत्पर सेवा
 • सुलभ व तत्काळ गरजेनुसार कर्ज वितरण
 • आकर्षक व्याजदराच्या विविध ठेव योजना
 • अनुभवी व प्रशिक्षित कर्मचारी

                                   

diwali03

                                          

Leave a Reply