अध्यक्ष टीप

4

श्री दिलीप र. पारकर
अध्यक्ष

सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्या.फोंडाघाट
प्रधान कार्यालय ,फोंडाघाट

सप्रेम नमस्कार ,

आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्थेने नियोजनपूर्वक कार्याची मालिका प्रवर्तित केलेली आहे.पतसंस्थेने गेल्या २५ वर्षांमध्ये आर्थिक आघाडीवर लक्षणीय प्रगती केलेली असून पुढे वाटचालीस सुरुवात केली आहे. आज पारंपारीकतेची जागा आधुनिकतेने घेतली आहे. संस्था आता यापुढील वाटचाल करताना नव्या स्वरुपात अधिक विश्वासाने, आधुनिकतेचा साज व आपुलकीची परंपरा घेऊन सभासदांच्या व ग्राहकांच्या सेवेत अधिक कार्यक्षम होण्यासाठी प्रयत्नशील आहे.