इतिहास

our-history
गरुडझेप – यशस्वी वाटचालीकडे

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या फोंडाघाट या शहर वजा गावात सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट” या संपूर्ण सिंधुदुर्गात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श पतसंस्था म्हणून ओळखल्या जाण-या आपल्या पतसंस्थेचा जन्म दि. १९/१०/१९९१ साली श्री. देव राधकृष्ण मंदिर वैश्य समाज फोंडाघाट या मंदिरात झाला.

फोंडाघाट हे गाव म्हणजे ग्रामिण भागात मोडणारे एक गांव. जरी लहान गांव असले तरी या गावात व्यापाराची परंपरा ही अनेक शतके जुनी असून सिंधुदुर्गातील बराचश्या भागातील व्यापार हा फोंडाघाटधील व्यापारावर अवलंबुन आहे. याचे कारण म्हणजे घाटमाथा आणि कोंकण यांना जोडणारी शेतमालाची मोठी उतार पेठ म्हणून ही बाजारपेठ ओळखली जायची. या गावामधील लोकांचा आर्थिक विकास जोमाने व्हावा या करीता फोंडाघाट मधील काही वैश्य समाजातील मंडळीनी पुढाकार घेवून आपण जनतेचे काहीतरी देणे लागतो या निव्वळ जाणीवेतून समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने विचार करण्यास सुरुवात केली. गावासाठी काहीतरी करावे असा निश्चय करुन अशा चांगल्या कार्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे ठरविले. यामध्ये प्रामुख्याने कै. दिगंबर गोविंद उर्फ दादा कोरगांवकर, कै. शंकर श्रीधर उर्फ दादा कुशे, कै. गणपत मोदी, श्री. अनंत दत्तात्रय उर्फ अण्णा कोरगांवकर, कै. राधाकृष्ण सोनू पावसकर, श्री. गणपत बिडये, कै. अशोक शामसुंदर पेडणेकर, श्री. राधाकृष्ण भिकू तायशेटे, कै. श्री. राजाराम शंकर मसुरकर, आणि त्यांचे बरेच सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. श्री. देव राधाकृष्णाचा आशीर्वद घेऊन त्याच्याच मंदीरात वैश्य समाजाची एक पतसंस्था सुरू करण्याचे स्वप्न या मंडळीनी पाहीले. आणि पाहीलेले स्वप्न सत्यात उतरण्यासाठी जोमाने काम करण्याची शपथ घेतली. आणि ख-या अर्थाने समाजातील प्रत्येक घटकाला आशेचा किरण दाखविण्याचे काम या मंडळीनी केले. परंतू कोणतेही काम करत असताना अडचणी या येणारच त्याप्रमाणे ‘वैश्य समाजाच्या” नावांने पतसंस्था सुरू करण्यास शासन दरबारी मान्यता मिळेनासी झाली पण हाती घेतलेले कार्य न थांबवता, निराश न होता अधिका-यांना आपण करत असलेल्या कार्याची गरज समजावून सांगुन, अनेक अडचणींना तोंड देत अखेर शेवटी ‘वैश्य समाजाच्या’ नावांने पतसंस्था सुरू करणेची प्रक्रीया सुरु झाली. यावेळेस मुख्य प्रवर्तक म्हणून कै. दिगंबर गो. कारगांवकर, कै. शंकर श्रीधर कुशे, श्री. दिलीप रा. पारकर, कै. श्री. विठ्ठल गोविंद नारकर, कै. श्री. महादेव गोविंद माईणकर, श्री. आनंद वि. अंधारी, कै. श्री. मनोहर रामचंद्र मोर्ये, कै. श्री. शशिकांत वासुदेव तायशेटे, श्री. विजयकुमार जगन्नाथ वळंजू, श्री. प्रभाकर आना बांदेकर, श्री. दिपक वसंतराव केसरकर, श्री. श्रीकृष्ण गोविंद शिरसाट, कै. श्री. रामकृष्ण अ. धडाम, श्री. प्रभाकर शिरसाट, कै. श्री. अशोक पांडुरंग बांदेकर, श्री. मोहन तायशेटे, श्री. गुरुनाथ लक्ष्मण पावसकर, श्री. सुरेश दत्तात्रय गोवेकर, कै. श्री. सुधीर राजाराम तेली, कै. श्री. यशवंत गणपत पोकळे, अ‍ॅड. श्री. अविनाश माणगांवकर यांनी काम पाहीले. अखेरीस तो सुवर्ण दिवस उजाडला. दि. १९/१०/१९९९ रोजी “सिंधुदुर्ग़ जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट” या नावाने संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकक्षेत्र असणारी आपली संस्था सरकार दप्तरी रजिस्टर झाली.

सुरुवातीच्या काळात संस्था नविन असल्यामुळे आवक जेमतेमच होती. मात्र कर्ज रुपातील जावक ही फार मोठयाप्रमाणात व्हायला लागली. कर्ज वितरण हा भाग फार महत्वाचा होता.  आवक कमि आणि जावक जास्त झाल्याने आर्थिक दृष्ट्या अक्षरश: सर्कस करावी लागत असे. त्यावेळी मात्र या संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. श्री. दिगंबर गोविंद उर्फ दादा कोरगांकर यांनी आर्थिक बाजू उचलुन धरली. सुरुवातीच्या काळात ज्या ज्या वेळी संस्थेस अर्थिक अडचणी येत होत्या त्याचे निवारण फक्त आणि फक्त दादांनी केले. म्हणून तर आज आपली ही संस्था संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये आघाडीवर असून दिमाखात उभी आहे.

श्री. देव राधकृष्णाच्या आशीर्वादाने आणि तमाम जनतेच्या सहकार्यातून संस्थेने आपले कामकाज श्री. देव राधाकृष्ण मंदीर वैश्य समाज फोंडाघाट या मंदीरातून सुरू केले. प्रथमत: फोंडाघाट, कणकवली आणि कुडाळ या तीन ठिकाणी संस्थेची कार्यालये सुरु करण्यात आली. संस्था स्थापन झाल्यानंतर संस्थापक संचालक म्हणून कै. दिगंबर गो.कोरगांवकर – चेअरमन, कै. सुधिर रा. तेली. – व्हा. चेअरमन, कै. शंकर श्रीधर कुशे – सेक्रेटरी, श्री. रमेश द. रेवडेकर, कै. हेमंत श्री. पारकर, श्री. दिलीप रा. पारकर, कै. श्री. विठ्ठ्ल गो. नारकर, श्री. महेश म. अंधारी, कै. श्री. यशवंत ग. पोकळे, सौ. राजश्री प्र. अंधारी, श्री. चंद्रकांत शं. पारकर, कै. श्री. जनार्दन रा. म्हापसेकर यांनी काम पाहीले. यामध्ये भर पडली ती कै. सदानंद सखाराम अंधारी, श्री. अरविंद रामचंद्र शिरसाट सर, श्री. गणपत विठोबा वळंजू, सौ. श्यामल सूर्यकांत म्हाडगुत, श्री. राजाराम श्रीधर लाड, श्री. अनंत बाळकृष्ण सापळे, श्री. प्रसाद श्रीकृष्ण पारकर, श्री. चंद्रकांत शं. पारकर, श्री.राजन दिगंबर बोभाटे, सौ. प्राजक्ता चंद्रकांत फोंडके, सौ. ममता मोहन पारकर, सौ. सुजाता संतोष अंधारी, श्री. रामकृष्ण सिताराम नाटेकर, कै. श्री. सगुन दत्ताराम उर्फ दादा बांदेलकर यांची तर संस्थेचे सचिव म्हणून श्री. महादेव अर्जुन राणे यांनी काही काळ अतिशय चांगल्या प्रकारची सेवा संस्थेस दिली. पतसंशस्थेचे हे कार्य अखंडितपणे सुरु राहण्यास या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. मध्यंतरीच्या काळात कै. सदानंद उर्फ भाऊ अंधारी यांनी चेअरमन म्हणून, तर संंचालक म्हणून श्री. विनायक अ. कोरगांंवकर, श्री. सुनिल इंद्रकांंत नार्वेकर, सौ. अलका आनंंद अंधारी यांंनी अतिशय उत्कृष्ठपणे कामगिरी बजावली. पतसंंस्थेने आज जी गरूड भरारी  घेतली आहे ती फक्त समाजातील प्रत्येक घटकाने केलेल्या सहकार्यामुळेच. आज आपली संस्था संंपूर्ण सिंधुदुर्गातून आठ शाखांंच्या माध्यमातून आपले कार्य व्यवस्थीतरीत्या पार पाडत आहे. आपणास अभिमानाने सांंगु इच्छितो कि, आपल्या पतंंसस्थेच्या फोंंडाघाट, कणकवली (कणकवली मध्ये दोन ठिकाणी) आणि कुडाळ येथे अशा एकूण चार जागा स्वमालकिच्या आहेत.

कै. दिगंंबर गोविंंद उर्फ दादा कोरगांंवकर यांंनी आपले आयुष्य हे समाजकार्यासाठी अपर्ण करून या पतसंंस्थेच्या रोपटयाचे वटवृक्षामध्ये रुपांंतर करण्यामध्ये त्यांंचा मोलाचा वाटा आहे. यावरच दादा थांंबले नाहीत. तर त्यांंनी आपल्या निरर्वाणीच्या क्षणी आता असलेल्या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या एकूण जागेपैकि ३०० सौ. फूट जागा देणगी स्वरूपात दिली आहे. आज या पतसंंस्थेचे चेअरमन म्हणून श्री. महेश मनोहर अंंधारी, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून श्री. ईश्वरदास शामसुंंदर पावसकर हे अतिशय उत्कृष्ठपणे कामकाज सांंभाळत आहेत. श्री. ईश्वरदास शा. पावसकर यांंना सन १९९९ मध्ये सरव्यवस्थापकाची रीतसर जबाबदारी सोपवण्यात आली. त्यावेळी आपल्या संंस्थेच्या एकूण तीन शाखा कर्यरत होत्या. श्री. पावसकर कारकिर्दित अजून पाच नविन शाखा सुरू करण्यात येवून आज एकूण आठ शाखांंचे कामकाज ते अतिशय प्रामाणीकपणे तसेच शासकिय अधिकारी, सभासद आणि पदाधिकारी यांंचा योग्य समन्वय राखुय आपले कामकाज चोखपणे व अखंंडित बजावत आहेत. संंस्थेच्या व्यवस्थापक कमिटीवर श्री.दिलीप राजाराम पारकर, श्री. गणपत विठोबा वळंंजू, सौ. श्यामल सुर्यकांंत म्हाडगुत, श्री. अरविंंद रामचंद्र शिरसाट, श्री. सुनिल दिगंंबर कोरगांंवकर, श्री. नंदकुमार दिनकर आळवे, श्री. सुभाष गोविंंद भिसे श्री. रमेश द. रेवडेकर, श्री. महेश खाडये हे सदस्य म्हणून आणि श्री. रमेश  नागेश भाट, श्री. गणेश गोविंंद मसुरकर हे शाखा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.

पतसंंस्थेचे हे कार्य करत असताना २४ वर्षे कशी निघुन गेली ही समजलेच नाही. आज आपली पतसंंस्था २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सतत ऑडिट वर्ग “अ” मिळविणारी आणि आर्थिक दृष्टया सक्षम असलेली तसेच गोरगरीबांंवची वाली म्हणून आपल्या या पतसंंस्थेकडे पाहीले जाते. संंस्थेकडील आर्थिक व्यवहार हे दिवसेंदिवस वाढत आहेत याची प्रचिती आपणास खालील आकडेवारी पाहील्यानंतर लक्षात येईल. आत्तापर्यंंत आपल्या संंस्थेने कोणत्याही वित्तीय संंस्थेकडून किंंवा बॅंंकाकडून कोणत्या ही प्रकारचे कर्ज घेतलेले नसुन आपल्या स्वत:च्या फंंडामधुन संंस्थेचे कामकाज सुरू आहे.

आज आपल्या संंस्थेमध्ये एकूण ९२ तरूणतरुणींंना रोजगार देण्यात आला असून त्यामध्ये कर्मचारी तसेच अल्पबचत प्रतिनिधींचा समावेश आहे. आज जी गरुड भारारी संंस्थेने घेतली आहे त्यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी वर्गाचा सिंंहाचा वाटा आहे.

आपली संंस्था ही वैश्य समाज या नावांंने असली तरी ती वैश्य समाजाव्यतीरीक्त इतर समाजासाठीसुद्धा सेवा बजावण्याचे काम करत आहे. ही संंस्था फक्त आर्थिक देवाण‌‌-घेवाणीचे कार्य करत नाही तर समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून गेली २४ वर्षे संंस्था अनेक सभासदाभिमुख योजना राबवून सभासदांंच्या गरजा जास्तीत जास्त प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.  संंस्था समाजाप्रती असलेली बांंधिलकी जपण्यासाठी अनेक माध्यमातून प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून शैक्षणिक प्रगतीसाठी अनेक चांंगले उपक्रम संंस्थेने राबविले आहेत. संंस्थेमार्फत गरजू विद्यार्थ्यांंना वह्या, पुस्तके, गणवेश, तसेच छत्र्या वाटप केले जाते. इ.१० वी, इ.१२ वी, कला, क्रीडा, सांंस्कृतीक क्षेत्रामध्ये सभासदांंच्या पाल्यांंचा विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल दरवर्षी गुणगौरव केला जातो. तसेच विविध क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्द्ल सभासदांंचाही दरवरर्षी सत्कार करण्याचे काम ही संस्था करीत आहे. मुलांंच्या ज्ञानात भर पडावी, त्यांंच्या गुणांमध्ये वाढ व्हावी या उद्देशाने संंस्था दरवर्षी इ.४ थी आणि ७ वी करीला शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करत आहे. ” संंस्थे आपल्या दारी” अशा पद्धधतीचे कार्यक्रम राबवून सभासदांंची, ग्राहकांंची गा-हाणी एकणे, त्यांंच्या शंकाचे योग्य प्रकारे निरसन करणे, त्यांंना संस्थेच्या नवनविन योजना समजावून सांंगणे, त्यांंना मार्गदर्शन करणे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित आणण्याचे काम संंस्थे करीत आहे आणि यापूढेही करत राहील.

या सर्व कार्याची पोचपावती म्हणून सन २०१३-१४ मध्ये आपल्या संंस्थेचे सरव्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ईश्वरदास शामसुंंदर पावसकर यांंचा ए.एस्. प्रतिष्ठान कोल्हापूर या संंस्थेतर्फे ‘ आदर्श सचिव ‘ आणि श्री. महेश मनोहर अंंधारी यांंना ‘आदर्श चेअरमन’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरविण्यात आले. त्याप्रमाणे नचिकेत प्रकाशन, नागपूर यांंनी सन २०१२-१३ या वर्षासाठी घेतलेल्या अहवाल स्पर्धेमध्ये आपल्या संंस्थेची कोकंंण विभागातून सर्वसाधारण गटामधून सर्वोत्तम पतसंंस्था म्हणून निवड होऊन नचिकेत प्रकाशनचे कार्यकारी संंचालक श्री. अनिल सांंबरे, महाराष्ट्र अर्बन बॅंंक फेडरेशनचे अध्यक्ष श्री. विद्याधर अनास्कर आणि पुणे अर्बन बॅंक असोशिएशनचे मानद सचिव अ‍ॅड. श्री. सुभाष मोहीते यांंच्या हस्ते “सर्वोत्तम पतसंंस्था” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. ए.एस् . प्रतिष्ठान, कोल्हापूर यांंनी सन २०१५ चा “आदर्श सहकारी संंस्था पुरस्कार ” देवून संंस्थेचा गौरव केला हा पुरस्कार प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी, मठाधिपती सिद्धगीरी मठ, कणेरी यांंच्या हस्ते प्रदान करण्यात आल.

दि.३१/०३/१५ अखेर, एकूण सभासद संख्या ४०५ वरुन ३४९९ पर्यंत गेली आहे, भागभांडवल रु.२,२६,५००/- वरुन रु.६२,३२,९००/-, ठेवी रु.५,५२,६०७/- वरुन रु.२२,३२,३४,३३२.८५/- पर्यंत, कर्ज रु.५,९८,०००/- वरुन रु.१६,४३,५८,२५५/- पर्यंत तर खेळते भांडवल रु.१७.५० हजारावरून रु.२,५१,४६,५५,५४०/- पर्यंत,एकूण नफा रु.७२,२३,५११.२४/- पर्यंत तर एकूण गुंतवणूक रु.६,१२,२७,५७७/- पर्यंत मजल मारली आहे. हे शक्य करणे तेही एवढ्या कमी कालावधीत म्हणजे साधी गोष्ट नाही.