सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांच्या सहकार्याचा हा सन्मान !- चेअरमन दिलीप पारकर.
सभासद, ठेवीदार तसेच हितचिंतक यांनी दिलेल्या सहकार्यातून संस्थेवर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे आपण टाकलेला विश्वास यापुढेही संस्था आपल्या परीने सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करील आणि संस्थेचा चढता आलेख सातत्याने ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहील, असा विश्वास पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना, चेअरमन दिलीप राजाराम पारकर यांनी व्यक्त करून संस्थेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी त्याचप्रमाणे पतसंस्थेच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे, या हेतूने बँको कोल्हापूर आणि गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या वतीने सहकारी पतसंस्थांसाठी बैंको अॅडव्हान्टेज “सहकार परिषद २०२१” चे आयोजन सायलेंट रिसॉर्ट, मैसूर- कर्नाटक येथे घेण्यात आली. या परिषदेत सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट, या संस्थेला रुपये ४० कोटी ते रुपये ५० कोटी या गटात प्रथम क्रमांकाचा बँको ब्लू रिबन २०२० पुरस्कार चिकोडी- निपाणी मतदार संघाचे खासदार श्री आण्णासाहेब जोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराकरिता महाराष्ट्रातून ७०० पतसंस्थांनी प्रवेशिका भरल्या होत्या. त्यातून सिंधुदुर्ग जिल्हा वैश्य समाज सहकारी पतसंस्था मर्यादित फोंडाघाट या संस्थेला हा सन्मान प्राप्त झाला. गेली सलग ५ वर्षे या संस्थेला हा पुरस्कार प्राप्त होत आहे. या परिषदेचे उद्घाटन मैसूरचे आयजीपी श्री. पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे आयोजक श्री. अविनाश शिंत्रे, मुख्य संपादक बँको कोल्हापूर व व श्री. अशोक नाईक, संचालक गॅलेक्सी इनमा-पुणे हे उपस्थित होते.
त्याचप्रमाणे या संस्थेला ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापूर यांचा आदर्श सहकारी संस्था पुरस्कार २०२१, आदर्श चेअरमन पुरस्कार २०२१, आणि आदर्श सचिव पुरस्कार २०२१ प्राप्त झाला असून त्याचेही वितरण कोल्हापूर येथे श्री. महेश कदम उपनिबंधक सहकारी संस्था नागरी बॅक्स असोसिएशन कोल्हापूर यांच्या शुभहस्ते आणि अनिल साळुंखे अध्यक्ष ए. एस. प्रतिष्ठान – कोल्हापूर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सलग पाच वर्षे पुरस्कार मिळवल्याबद्दल संस्थेचे जिल्ह्यामध्ये कौतुक होत आहे…..