कर्ज योजना

कर्जाचा  प्रकार

कमाल कर्ज मर्यादा

१.सामान्य कर्ज : रु.१,००,००० पर्यंत
२. तारणी कर्ज :
नवीन वाहन तारण कर्ज: वाहन तारण किंमतीच्या ७५% आणि जास्तीत जास्त कर्ज मर्यादा संंस्थेच्या स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २० लाखापर्यंत जी रक्कम  कमी असेल ती कर्ज रक्कम.
५ वर्षाच्या आतील जुने वाहन तारण कर्ज : पाच वर्षाच्या आतील जुने वाहन तारण मूल्याकंन किंंमतीच्या ५०% आणि जास्तीत जास्त कर्ज मर्यादा संंस्थेच्या स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. १० लाखापर्यंंत जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
स्थावर तारण कर्ज (गृह बांंधणी/ फ्लॅट खरेदी कर्ज): स्थावर तारण (गृह बांंधणी/ फ्लॅट खरेदी) कर्ज स्थावर मुल्यांकनाच्या ७५% पर्यंंत आणि स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु.२५ लाखापर्यंंत जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
व्यावसायिक कर्ज : स्थावर तारण मूल्यांंकन किंंमतीच्या ७०% एवढे आणि स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु.२५ लाखापर्यंंत जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
मशिनरी तारण कर्ज : स्थावर तारण कर्ज मशिनरी तारण मूल्यांकनाच्या ५०% किंंमतीचे असले पाहिजे आणि स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त नाही एवढी व जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २५ लाखापर्यंत जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
माल तारण  मुदत कर्ज : माल तारण कर्ज रक्कमेच्या दुप्पट किंमतीच्या एवढा तीन महिन्याच्या आतील स्टॉक तारण असावा आणि जास्तीत जास्त कर्ज मर्यांंदा संंस्थेच्या स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त असू नये व जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रु. २० लाखापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
ठेव तारण कर्ज : स्वत:च्या अथवा त्रयस्थ नावे असणा-या मुदत ठेवी तारण घेवून मुदत ठेवीच्या ८५% पर्यंत किंंवा जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २५ लाखापर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल कर्ज रक्कम.
सोने / चांंदी/ दागदागिने तारण कर्ज : सोने, चांंदी, दागदागिने बाजार किंंमतीच्या ८५% पर्यंंत किंंवा जास्तीत जास्त कमाल कर्ज मर्यादा रु. २५ लाखापर्यंंत यापैकी जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
व्यावसायिक शिक्षण/ उच्च शिक्षण कर्ज : मध्यम मुदतीचे, स्थावर तारण कर्ज रकमेच्या दुप्पट किंंमतीचे आणि जास्तीत जास्त कर्ज मर्यादा संस्थेच्या स्वनिधीच्या २०% पेक्षा जास्त असू नये व जास्तीत जास्त कर्ज मर्यादा रु. २० लाखापर्यंंत यापैकी जी रक्कम कमी असेल ती कर्ज रक्कम.
३.कॅश क्रेडीट कर्जे : स्वनिधीच्या १०% किंंवा रु.२० लाखापर्यंंत यातील किमान असेल ती रक्कम ; मात्र कर्ज रकमेच्या दुप्पट किंंमतीचे स्थावर तारण घेणे बंंधनकारक राहील. सदर कर्ज १ वर्ष मुदतीचे राहील.